उस्मानाबाद / प्रतिनिधी-

केंद्र शासन व जागतिक बँक यांचे संयुक्त विदयमाने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत उस्मानाबाद जिल्हयातील 55 गावांत अटल भूजल योजना राबविण्यात येत आहेत.

या योजनेअंतर्गत अंमलबजावणी टप्पातील मागणी आधारित (पाणी बचतीच्या उपाययोजना) कामे व पुरवठा आधारित (जलसंधारण पुनर्भरण उपाययोजना) कामे करण्यात येणार आहेत या अनुषंगाने दि.24 ऑगस्ट 2022 रोजी जागजी ता.जि.उस्मानाबाद येथे रिजार्च शॉफट कामाचा शुभारंभ मा. वरिष्ठ भूवैज्ञानिक   एस.बी.गायकवाड व  सरपंच लक्ष्मण बनसोड यांच्या हस्ते करण्यात आला. हे काम 55 गावांत करण्यात येणार आहे. 

मासिक बैठक / ग्रामसभेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या जलसुरक्षा आराखडा मधील समाविष्ठ केंद्र व राज्य शासनाच्या विविध पुनर्भरण उपाययोजना लोकसहभागातून राबविण्यात येणार आहेत. यामुळे भूजलाची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार असल्याचे मा. वरिष्ठ भूवैज्ञानिक एस.बी.गायकवाड यांनी सांगितले. तर यावेळी सरपंच   लक्ष्मण बनसोडे, ग्रामविकास अधिकारी  एसा.एन.शिंदे,  कचरु हिंगे, मारुती लहाडे शेतकरी, डॉ. मेघा शिंदे सहा. भूवैज्ञानिक, श्री.आर.बी.शेटे कनिष्ठ भूवैज्ञानिक, श्री.ब्रम्हदेव माने IEC तज्ञ भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा उस्मानाबाद व ग्रामस्त उपस्थित होते.


 
Top