परांडा / प्रतिनिधी -

विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा देऊन मोठमोठे अधिकारी व्हावे आणि देशाची सेवा करावी,असे प्रतिपादन परंडा येथील न्यायालयातील न्यायाधीश आर. टी. इंगळे यांनी केले.

   शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयांमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिव्हिल जज वरिष्ठ विभाग आर टी इंगळे उपस्थित होते.तर व्यासपीठावर जॉईंट सिविल जज वरिष्ठ विभाग श्रीमती जे एन यादव, जॉईंट सिविल जज कनिष्ठ विभाग पी.एस.ठाकरे, सेकंड जॉइंट सिविल जज कनिष्ठ विभाग आय जे महादेव कोळी,थर्ड जॉईंट सिविल जज कनिष्ठ विभाग श्रीमती एम.व्ही, निंबाळकर, आय क्यू एसी चेअरमन डॉ. महेशकुमार माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. दत्तात्रेय मांगले आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी कनिष्ठ वरिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग ,राष्ट्रीय सेवा योजना विभाग, अँटी रॅगिंग समिती, महिला लैंगिक तक्रार निवारण समिती च्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ विशाल जाधव, डॉ कृष्णा परभने, श्री जयवंत देशमुख, हनुमंत मार्तंडे यांनी सहकार्य केले .यावेळी जॉईंट सिविल जज कनिष्ठ विभाग श्रीमती एम व्ही निंबाळकर थर्ड जॉइंट सिविल जज कनिष्ठ विभाग, सेकंड जॉइंट सिव्हिल जज कनिष्ठ भागाचे आय जे महादेव कोळी यांनीही आपली मनोगत व्यक्त केली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विशाल जाधव यांनी केले.प्रास्ताविक डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले.यावेळी पी.एस ठाकरे यांनी ड्रग्स यावर आपले मनोगत व्यक्त केले. श्रीमती एम.व्ही निंबाळकर यांनी अन्टी रॅगिंग या विषयावर आपले व्याख्यान दिले.आय. जे. महादेव कोळी यांनी आंतरराष्ट्रीय युवक दिन या विषयावर व्याख्यान दिले.शेवटी कार्यक्रमाचे आभार डॉ.महेशकुमार माने यांनी मानले.

 
Top