उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बँक ऑफ महाराष्ट्र  एम्प्लॉईज  फेडरेशन औरंगाबाद यांच्या मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी तालुका उस्मानाबाद येथे   भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष .,  भारत विविधतेत एकता, मेरा भारत महान,  भारतीय तिरंगा या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. यामद्ये लहान गटातून 32 विद्यार्थी व मोठ्या गटातून 31 विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेतील िवजेत्यांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले. 

 यावेळी सरपंच  प्रमोद काका वीर ,मुख्यध्यापक बशीर तांबोळी ,महाराष्ट्र् बँक फेडरेशनचे विभागीय सरचिटणीस कॉम्रेड कुलकर्णी  यांनी आपले मनोगत व्यक्त केले .  कॉम्रेड सुधीर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड उमाकांत कुलकर्णी , तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच  प्रमोद काका वीर ,व्यवस्थपन समितीचे अध्यक्ष विजयकुमार नांदे , कॉम्रेड होळीकर  , माने साहेब,शहेनवाझ  मुलानी  होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक  यांनी   परिश्रम केले. 


 
Top