परंडा / प्रतिनिधी -

भारतीय स्टेट बँक शाखा परंडा यांच्या सहाय्याने भोंजा हवेली येथे पिक कर्ज नुतनीकरण मेळावा शुक्रवार दि.१९ रोजी आयोजित करण्यात आला यावेळी भारतीय स्टेट बँक चे मॅनेजर निलेश बोंबले यांनी शेतकऱ्यांना पिक कर्ज विषयी सविस्तर माहिती देऊन पिक कर्जापासून एक ही शेतकरी वंचित राहु देणार नाही असे संबोधित केले.      

  यावेळी शेतकी अधिकारी अभय काटुळे, सचिन पाटील सर, डायरेक्टर/लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, समन्वयक महेश पाटील, प्रफुल्ल मोरे, प्रविण नेटके, निखिल मोरे, कृष्णा मांजरे, बालाजी मोरे, उमराव नेटके, बाळासाहेब मांजरे, अमोल नेटके, संदिप मोरे, बापू सरवदे, देविदास सरवदे, संदिप नेटके, भैरवनाथ मोरे आदी शेतकरी व नागरीक उपस्थित होते.


 
Top