उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कलाध्यापक शेषनाथ दगडोबा वाघ यांची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुण गौरव पुरस्कार  २०२१ - २०२२ साठी कला या राज्यस्तरीय पुरस्कार प्रस्तावातून जिल्हास्तरावर विभागीय पातळीवर निवड झाली. 

या जिल्हास्तरीय निवडी बद्दल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस सौ. प्रेमाताई सुधीर पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य सुधीर पाटील , प्राचार्य तथा मुख्याध्यापक साहेबराव देशमुख, उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी, पर्यवेक्षक वाय.के.इंगळे जाधव आर.बी.,के.वाय. गायकवाड,डी.ए. देशमुख,के.टी. कला विभाग प्रमुख एन.आर. नन्नवरे, पाटील फाऊडेशन प्रमुख विनोद आंबेवाडीकर शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी व मेलडी स्टार प्रवर्तक तथा कलाविष्कार अकादमी अध्यक्ष युवराज नळे , उपाध्यक्ष विधिज्ञ राज कुलकर्णी ,जिल्हा संस्कार भारती जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, जिल्हा सचिव प्रभाकर चोराखळीकर, शहर संयोजन समिती अध्यक्ष शरद वडगावकर, पहाधिकारी मित्रमंडळी ने अभिनंदन केले .


 
Top