तेर/ प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील पारधी समाज बांधवांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी आदिवासी दिनानिमित्त क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे समाज बांधवांच्या वतीने पूजन करण्यात आले दरम्यान आदिवासी दिनानिमित्त पारधी समाजातील लहान मुलांनी आदिवासींची पारंपरिक वेशभूषा परिधान करत आदिवासी गीतांवर विविध प्रकारच्या पारंपारिक नृत्याचे सादरीकरण करत ग्रामस्थांची मने जिंकली .यावेळी उपस्थित ग्रामस्थांना पारधी समाज बांधवांच्या वतीने अल्पोपहाराची सोय करण्यात आली.
यावेळी रमेश पवार , दादा पवार , आप्पा काळे , विश्वंभर काळे , दिलीप पवार , रमेश पवार , किशोर पवार , देवराव पवार , लक्ष्मण पवार , सुभाष पवार , काशिनाथ काळे , शंकर काळे , बापू पवार , सुनिल पवार , तानाजी काळे , तानाजी पवार , मिथुन काळे , संजय पवार , कालिदास पवार , संतोष पवार आदिंसह पारधी समाज बांधवांनी जागतिक आदिवासी दिन व क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती यशस्वीपणे साजरी करण्यासाठी परिश्रम घेतले.