वाशी / प्रतिनिधी-

 वाशी तालुक्यातील पारगाव व वाशी येथे भूम परंडा वाशी चे  आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत   यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना व भाजपा युतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

यावेळी वाशी येथे माजी नगरअध्यक्ष नितीन चेडे ,शिवहार स्वामी ,सत्यवान गपाट बाळासाहेब मांगले ,दिनकर शिंदे ,महादेव क्षिरसागर ,बाळासाहेब मांगले ,उद्धव साळवी ,प्रसाद जोशी तर पारगाव येथे  शिवसेनेचे उप तालुका प्रमुख विकास तळेकर, एडवोकेट प्रवीण गाडे, ,तानाजी कोकाटे,राजा कोळी, आदी महायुतीचे पदाधिकारी व आमदार सावंत   समर्थक उपस्थित होते  


 
Top