उस्मानाबाद /प्रतिनिधी -

मराठवाडा साहित्य परिषदेत उस्मानाबाद व इतर सामाजिक संस्था, संघटना तसेच शहरातील जेष्ठ नागरिक यांच्या वतीने माधव गरड यांच्या निधनानिमित्त रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, येथे दिनांक १४:ऑगस्ट २०२२ रोजी शोकसभा घेण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले.

या शोकसभेत एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील,मकरंद राजेनिंबाळकर, एम.डी. देशमुख, डॉ. अभय शहापूरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज पाटील, चंद्रकांत मुळे, शरद राऊत, प्राचार्य डॉ. सुलभा देशमुख, प्राचार्य डॉ. प्रशांत चौधरी, प्रा. डॉ.  सतीश कदम, कमलताई नलावडे, भा.न. शेळके, एस. डी‌ कुंभार, नितीन तावडे, दिलीप गणेश, नितीन बागल, युवराज नळे यांनी माधव गरड यांच्या कार्याविषयी भावना व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतुकराव ठाले पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर,  सोलापूर मसापच्या अध्यक्ष डॉ. श्रुतीश्री वडकबाळकर यांनी पाठविलेल्या शोकसंदेशाचे वाचन नितीन तावडे, प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी केले.

या शोक सभेस बालाजी तांबे, धर्मवीर कदम, आशिष मोदाणी, प्रशांत पाटील, अग्निवेश शिंदे, श्री झेंडे, दर्शन कोळगे, मुकुंद सस्ते, राजाभाऊ शेरखाने, चंद्रशेखर सुरवसे, सिद्धार्थ बनसोडे, रेखा ढगे, अनिता देशमुख, सुनीता गुंजाळ, स्नेहलता झरकर, विजय गायकवाड, शीला उंबरे, धर्मराज राऊत, डी के शेख, डॉ. रुपेशकुमार जावळे, सुभाष चव्हाण, राजेंद्र अत्रे, नंदकुमार गवारे, प्रा.नंदकुमार नन्नवरे, अविनाश मुंडे, कृष्णा शिंदे, युसुफ सय्यद, शेषनाथ वाघ, बाळू घेवारे, बाळ पाटील, पंडित कांबळे, शाम नवले, हनुमंत पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Top