उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहर पाणीपुरवठा योजना अंतर्गत समर्थ नगर पाणी टाकी निकृष्ट बांधकाम बद्दल संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उस्मानाबाद नगर परिषदचे माजी गटनेता युवराज नळे  यांनी केली आहे. 

 या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  केंद्र सरकारच्या “अमृत” योजना अंतर्गत शहरवासीयांची तहान भागवण्यासाठी करोडो रुपये निधी देण्यात आला.मात्र संबंधित ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे समर्थ नगर येथील नवीन पन्नास लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकीचे काही बीम व कॉलम तुटल्याने सदरची टाकी सध्या उपयोगात नाही. जवळपास निम्म्या शहराला या टाकीवरुन पाणी पुरवठा होतो. ही टाकी सध्या बाधित झाल्यामुळे इथून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून सध्या एम आय डी सी फिल्टर येथून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र यामुळे नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा होण्यात अनेक अडथळे निर्माण होत आहेत.  ठेकेदार व नगरपालिका मार्फत ही डॅमेज झालेली टाकी तशीच दुरुस्ती करून वापरण्याचा प्रयत्न केल्यास तेथील नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न होईल.म्हणून ती टाकी संपूर्ण पाडून परत नव्याने चांगल्या दर्जाचे बांधकाम करून घ्यावे.   म्हणून संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करून गुन्हा दाखल करण्यात यावा व शहरातील इतरही पाण्याचा टाक्या चे सुद्धा स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. 


 
Top