लोहारा/प्रतिनिधी

लोहारा शहरामध्ये एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या वतीने तालुका स्तरीय कार्यालयाचे उद्घाटन पंचायत समितीचें विस्तार कृषी अधिकारी के.डी.निंबाळकर व कृषी सहाय्यक शैलेश जट्टे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. 

लोहारा शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामानंतर अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत शेतकऱ्याकडून पंतप्रधान फसल पिक विमा योजना तसेच विविध योजनेबाबत पिकावरील विमा उतरविणे आदी बाबी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने कराव्या लागत आहेत. यामध्ये अनेक शेतकरी अशिक्षित असल्याने ऑनलाइन पद्धतीने पिकांचे नुकसान अथवा पीक विमा भरणे आदी समस्या मुळे अनेक शेतकरी वंचित राहू नये, वेळोवेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिकांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करावे. याप्रसंगी एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक बी.बी.इनकर,ए एस मुळे, तालुका समन्वय अधिकारी अकबर शेख, एस.एस. मोहिते, एस.डी.मनसुबे, यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.


 
Top