उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  तालुक्यातील कसबे तडवळे येथील भूमीहीम शेतकरी नागोराव पवार यांनी स्वतःला एक गुंठाही जमीन नसताना तर भारत भालेराव या शेतकर्‍यांने घरच्या गायीच्या वासरांपासून बैलजोडी तयार करुन मागील 40 वर्षापासून बैलजोडीचा सांभाळ करत आहेत. विशेष म्हणजे शुक्रवारी (दि.27) बैलपोळा सणानिमित्त त्यांच्या घरी व शेतात जावून राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी त्यांचा मानाचा फेटा, शाल, श्रीफळ घालून सन्मान करत कृतज्ञता व्यक्त केली.


 
Top