उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या  हस्ते दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ०९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रांगणात होणार आहे. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमा दिवशी विविध मागण्या संदर्भात लोक संघटना, पक्ष, कार्यकर्ते हे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण, धरणे, मोर्चा, रॅली, अशा कार्यक्रमांचे आयोजन करतात. त्याअनुषंगाने उस्मानाबाद शहरातील श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते सर्कीट हाऊस, शिंगोली पर्यंत दिनांक १४ ऑगस्ट २०२२ चे ००.०० वाजल्यापासून ते दिनांक १५ ऑगस्ट २०२२ च्या २४.०० वाजेपर्यंत आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध असून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ येथील उपविभागीय दंडाधिकारी योगेश भिमराव खरमाटे यांनी लागू केले आहे.


 
Top