उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७५वा वर्धापन दिन समारंभानिमित्त १५ ऑगस्ट, २०२२ रोजी जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहणाचा समारंभ सकाळी ठीक ०८.१५ वाजता जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आला आहे.

 कोरोना विषाणुची पार्श्वभूमी विचारात घेता, केंद्र शासाच्या गृह मंत्रालय तसेच आरोग्य व कुंटुंब कल्याण मंत्रालय यांनी, कोरोना संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करत स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणास राष्ट्रीय पोषाख परिधान करुन, वेळेवर उपस्थित रहावे. “ असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे सहायक प्रशासन अधिकारी यांनी केले आहे.


 
Top