उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील भन्साळी निवासी जिल्हा संस्कार भारती समितीच्या वतीने सहा अनिवार्य उत्सवा पैकी गुरु पोर्णिमा उत्सव संपन्न झाला प्रथम कलेची देवता नट राज पुजनासह संस्कार भारतीचे संस्थापक पद्मश्री डॉ. श्रीधर वाकणकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले त्यानंतर ध्येयगीताने उत्सवाची सुरुवात करण्यात आली .

 जिल्हासचिव प्रभाकर चोराखळीकर यांनी गुरु पोर्णिमा मानव जीवनातील गुरु महत्व मार्गदर्शनातून व्यक्त केले. या उत्सवाला जिल्हाध्यक्ष श्याम सुंदर भन्साळी जिल्हा संगीत विधाप्रमुख सुरेश वाघमारे सुंभेकर , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रवींद्र कुलकर्णी, संस्कार भारती समिती सदस्या अर्चना अंबुरे , ज्योती भन्साळी, चिरंजीव अंबुरे , सिंद्धात भन्साळी आदि कलासाधक सदस्य उपस्थित होते पसायदानाने सांगता झाली सुत्रसंचालन देवगिरी सहचित्रकला विधाप्रमुख तथा समिती मार्गदर्शक शेषनाथ वाघ यांनी केले तर शहर संयोजन समिती अध्यक्ष शरद वडगावकर यांनी आभार मानले .

 
Top