उमरगा / प्रतिनिधी-

शेतकरी हा आपल्या भारत देशाच्या सर्वांगीण विकासाचा कणा आहे. शेतकऱ्यां मुळेच आपल्या देशाची प्रगती शक्य आहे. शेती व्यावसायाला चालना देण्या साठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेने महत्वपूर्ण योगदान दिले आहे. शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेती व्यावसाय चालना द्यावी. बँकांच्या कर्जाची नियमित परतफेड करून आपली आर्थिक प्रगती करावी असे प्रतिपादन महाराष्ट्र ग्रामीण बैंकेचे अध्यक्ष मिलींद गरड यांनी केले.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने “ जन संपर्कातून जन भागीदारी “ या संकल्पने अंतर्गत २० जुलै पासून बँकेच्या वतीने संपुर्ण मराठवाडयात सहाशे किमी ची  “ महा ग्रामीण चेतना सायकल रॅली “ काढण्यात आली होती. या सायकल रॅलीचा समारोप रविवार दि. ३१ जुलै रोजी झाला. या निमित्त शहरातील मीनाक्षी मंगल कार्यालयात अर्थिक व डिजिटल साक्षरता मेळावा घेण्यात आला .या वेळी आयोजित मेळाव्या प्रसंगी घरड बोलत होते. सर व्यवस्थापक संजय वाघ, लातूर विभागीय व्यवस्थापक अविनाश कामतकर ,व्यवस्थापक राहुल गुफ्ता , निलेश विजयकुमार , मराठवाड्यातील सर्व विभागीय व्यवस्थापक , सर्व शाखांचे आजी माजी व्यवस्थापक यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना घरड म्हणाले कि - अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांना शेती व्यावसाय करावा लागतो.निसर्गाच्या लहरी पणा मुळे अनेक संकटाना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. अशा संकटाच्या वेळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेने मराठवाडयातील शेतकऱ्यांना आधार दिला आहे. महिला बचत गटाना अर्थ साह्य करून बॅंकेच्या वतीने ग्रामीण भागातील सामान्य जनतेचे आर्थिक हित जपले आहे. शेतकऱ्यानी आपली अर्थिक पत उंचावण्या करिता .बॅंकेच्या कर्जाची परतफेड वेळेत करून शेतकऱ्यांनी कर्ज मुक्त व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

सरव्यवस्थापक संजय वाघ यांचे भाषण झाले.या वेळी महिला बचतगट , पीक कर्ज गृह- बांधकाम कर्ज , विविध व्यवसाय कर्ज वितरणाचे मंजुरी पत्र कर्ज धारकांना देण्यात आले. १३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट या कालावधी दरम्यान होणाऱ्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त उपस्थितांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. या वेळी “ साथ विकासाचा वाट विकासाची “ बँकेच्या कर्मचारी कलावंतानी पथनाट्याचे सादरीकरण केले .

सायकल रॅलीत सहभागी झालेल्या सर्व बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविक लातूर येथील विभागीय व्यवस्थापक अविनाश कामतकर यांनी केले. संतोष प्रभावती , संजय वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन अजिंक्य धुरगुडे व दिपीका डोमकुंडवार यांनी केले . बँक अधिकारी कुलदीप पवार , उद्योजक नागनाथ कुंभार , संतोष गब्बूरे यांची उपस्थिती होती. आभार शाखा व्यवस्थापक मयूर थोरात व सचिन माने यांनी मानले.

 
Top