परंडा / प्रतिनिधी : -

 परंडा तालुक्यातील देवगाव (खुर्द) येथील शेतकरी राजेद्र मुरलीधर कोकणे वय वर्ष ५५ यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळुन दि.१६ ऑगष्ट रोजी सकाळी ६.३०च्या सुमारास स्वाताच्या शेतातील लिबांच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्यां केली.

 राजेद्र कोकणे यांना ३ एकर जमीन आसुन त्यांच्याकडे  खाजगी व बॅकेचे कर्ज असल्याची माहीती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.या घटनेचा पोलीस प्रशासनाने पंचनामा केला आसून मयत कोकणे यांची उपजिल्हा रुग्नालयात शेवच्छदन तपासनी करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.दुपारी ३च्या दरम्यान राजेद्र कोकणे यांच्या वर देवगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.या वेळी नातेवाईकासह गावातील नागरीक मोठ्या संख्याने उपस्थीत होते.राजेद्र कोकणे यांच्या पाच्छात आई,पत्नी,तीन मुले आसा परीवार आहे.

 
Top