परांडा / प्रतिनिधी - 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालयांमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे व आदेशाने सामूहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल जाधव उपस्थित होते.

      यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .कार्यक्रमाचे आयोजन, प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले आणि सर्वांचे आभारही मानले. 


 
Top