परंडा / प्रतिनिधी : -

 परंडा तालुक्यातील अनाळा येथे एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी क्र -401 मध्ये गरोदर मातांसाठी गोद भराई कार्यक्रम घेण्यात आला . दि.१७ रोजी येथील अंगणवाडी क्र .401मध्ये गावातील सात गरोदर मातांचा सत्कार सरपंच आंबिका जोतीराम क्षिरसागर यांच्या हस्ते करण्यात आला .

गरोदर मातांना पोषण आहार , साड्याचे वाटप करण्यात आले. गावातील साळूबाई भास्कर भुजे यांच्या वतीने गरोदर मातांना मोफत साड्या वाटप करण्यात आल्या . गरोदर मातांनी गरोदर पणात आहार कसा घ्यावा , गरोदर पणात शरीराची काळजी कशी घ्यावी याविषयी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. अमृता भांडवलकर यांनी महिलाना मार्गदर्शन केले . कार्यक्रमासाठी सरपंच आंबिका क्षिरसागर , आशासेविका अनिता क्षिरसागर , जयश्री हिवरे , आरोग्य केंद्राच्या परिचारिका सुनिता मिटकर, लॅब टेक्नीशियन एम . वाय. शेख , सर्व शिक्षिका यांच्या सह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. .कार्यक्रमाचे उत्तम नियोजन अंगणवाडी सेविका हसीना सलीम शेख व मदतनिस विमल चौघुले यांनी केले.


 
Top