उस्मानाबाद / प्रतिनिधी-
आनंद पोलिस ठाण्याचे पथक एपीआय चैनसिंग घुसिंगे यांच्यासह गस्तीवर असताना सेंट्रल बिल्डिंगच्या आडोशाळा संशयितरित्या आढळलेल्या व्यक्तीला विचारपूस केली असता तो परभणी येथील बालाजी विष्णू माने (३२) असून दुचाकी चोरुन आणल्याचेही समोर आले. त्यावेळी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी इंजीन, सांगाडा नंबरवरुन माहिती घेतली असता माने याने ती दुचाकी परभणी रेल्वे स्थानकावरुन चोरल्याचे समजले. सीसीटीव्हीवरून ते स्पष्ट झाले. यापूर्वी माने याच्यावर चोरी, जबरी चोरी केल्याचे १२ गुन्हे दाखल आहेत. बालाजी हा सराईत गुन्हेगार असल्याचे कळताच आनंदनगर पोलिसांनी त्या चोरीच्या दुचाकीसह बालाजी यास अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.