उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत ऑनलाईन बदली लवकर करा, अशी मागणी राज्य एकल शिक्षक सेवा मंचच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

िनवेदनात नमूद करण्यात आले आहे की,मागील चार ते पाच वर्षापासून महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक यांच्या ऑनलाईन बदली झालेल्या नाहीत. या संदर्भात अनेक निवेदन देऊन ही   अनेक वेगळी वेगळी कारण सांगून या बदलाया टाळण्याचे काम केले गेले आहे.

परंतु आता ऑनलाईन बदली प्रक्रिया करण्यासाठी मागिल राज्य सरकारने  एक कमिटी स्थापन केली होती, तसेच त्या कंपनीने राज्यातील सर्व शिक्षक संघटना ना बोलवून चर्चा करून एक बदली चे सॉप्टवेअर तयार केले होते.त्यानंतर  त्यांनी एका कंपनीला ऑनलाइन बदली करण्याचे सॉप्टवेर तयार करायला सांगितले होते. 

ते आता पूर्णतः तयार झाले आहे व त्याचा कसा वापर करायचा याचा डेमो पण झालं आहे.तरी  आपल्या स्तरावरून संबधित अधिकारी आणि सचिव यांना आदेशित करून ते जिल्हा अंतर्गत बदलीचे सॉफ्टवेअर रन करण्यास सांगून महाराष्टातील लाखो शिक्षकांची सोय करून द्यावी अशा मागणीचा उल्लेख करण्यात आला आहे.  

निवेदनावर  राज्य कोषाध्यक्ष    पवन सूर्यवंशी, राज्य उपाध्यक्ष  शिवाजी खांडेकर पाटील , उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष खुद्बुबुद्दिन शेख  , सरचिटणीस    दिपक हजारे  आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


 
Top