उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पहिले बिल द्यावे, शासनाने साखर कारखान्यांचे साखर विक्री परवाने रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या वतीने बुधवारी (दि. ३) येडशी येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसह आंदोलन करण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी अतिरिक्त ऊस जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे जानेवारी ते मे पर्यंत पाठवला. परंतु, साखर कारखान्यांनी अद्यापपर्यंत पहिली उचल दिली नाही.


 
Top