उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भाजपच्या माजी सैनिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नारायण अंकुशे हे उस्मानाबाद दौऱ्यावर आले असता त्यांनी येथील भाजप कार्यालयास भेट दिली. भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. अंकुशे यांनी शहरात सैनिक फेडरेशनच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन केले.

अंकुशे यांनी माजी सैनिक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच माजी सैनिकांना त्यांच्यासाठी उपयोगी योजनांची माहिती दिली. तसेच भारतीय वायु सेनेत अग्निपथ योजनेंतर्गत अग्निविरांची भरती सुरू असून जिल्ह्यातील युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी माजी सैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top