उस्मानाबाद / प्रतिनिधी-

५ सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या अनुशंगाने उस्मानाबाद जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांना शिक्षकरत्न पूरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर उत्कृष्ट कार्य करणा-या शिक्षकांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव दि.५ सप्टेंबर पर्यंत ई-मेल, व्हाटसअप,पोस्टाने किंवा प्रत्यक्ष दाखल करावेत असे आवाहान धनेश्वरी शिक्षण समूहाच्यावतीने दिलेल्या  प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

  उस्मानाबाद जिल्ह्यातील प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक,इंग्रजी माध्यम शाळा यामध्ये जे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत तसेच क्लासेस,संगणक प्रशिक्षण संस्था व इतर सम माध्यमातून विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले आहे अशा सर्व शिक्षकांनी आपले प्रस्ताव 20 ऑगस्टपर्यंत सादर करावेत असे आवाहान केले आहे.आधिक माहितीसाठी 9881914434,8275303063 या क्रमांकावर संपर्क साधावा.तसेच आपले परिपूर्ण प्रस्ताव dhaneshwarishikshansamuh@gmail.com या ई-मेल वरती पाठवावेत किंवा पोस्टाने पाठवायचे असतील तर अध्यापक महाविद्यालय(बी.एड.),डॉ.वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कँपस,गडपाटी(आळणी) ता.जि.उस्मानाबाद पत्यावर पाठवावेत.शिक्षक दिनाचे औचित्यज साधुन या पुरस्कराचे वितरण उस्मानाबाद येथे 05 ते 15 सप्टेंबर दरम्यान करण्यात येणार आहे.कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून पुरस्कार देण्यात आले नव्हते मात्र यावर्षी पुन्हा एकदा हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

 
Top