उस्मानाबाद / प्रतिनिधी-

माहितीचा अधिकार प्रसारक संस्थेच्या उस्मानाबाद शहर उपाध्यक्षपदी जमीर अहेमद मोहियोद्दीन सय्यद यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार अजमेरा यांनी निवडीचे पत्र सय्यद यांना दिले आहे. या निवडीचे आरटीआय कार्यकर्त्यांमधून स्वागत होत आहे.

 माहिती अधिकार कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम ही संस्था करत आहे. संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार अजमेरा, कार्याध्यक्ष शहाजी मुंडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद शहर उपाध्यक्षपदी जमीर अहेमद मोहियोद्दीन सय्यद यांची निवड करुन नियुक्तीपत्र देण्यात आले.  ही निवड 2 वर्षांसाठी राहणार आहे. निवडीनंतर सय्यद यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे जिल्हा कार्याध्यक्ष अहमद चाऊस, ग्रामीण जिल्हा सचिव संजय पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्ष संजय सांगोळे, अप्पर जिल्हाध्यक्ष तौफिक शेख, जिल्हा कार्याध्यक्ष हाजी फरियोद्दीन मोमीन, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पवार, विधी सल्लागार अ‍ॅड.अनिल शिंदे, ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रभाकर शिंदे, तालुकाध्यक्ष गोपीनाथ पोंदे, तुळजापूर ग्रामीण तालुकाध्यक्ष महादेव कुठार, उस्मानाबाद शहर कार्याध्यक्ष अशपाक शेख, उस्मानाबाद ग्रामीण तालुकाध्यक्ष अनिल कांबळे, शहर युवक अध्यक्ष एजाज सय्यद, तालुका ग्रामीण संघटक दत्तात्रय टापरे, शैलेश देव व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top