उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील छत्रपती शिवाजी नगर सांजा चौक शाहु स्मृती येथे २७ ऑगस्ट रोजी मुलायम आवाजाचे प्रसिद्ध गायक मुकेश यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त कलाविष्कार अकादमी द्वारा संचलित मेलडी स्टारच्या वतीने मुकेश यांनी गायलेल्या बहारदार गीतांच्या गायनातून हौशी छंदी गायकांनी आदारांजली वाहिली.

 याप्रसंगी कालाविष्कार अकादमीचे अध्यक्ष तथा प्रवर्तक मेलडी स्टार समुह युवराज नळे समन्वयक रवींद्र कुलकर्णी , शेषनाथ वाघ, मुकुंद पाटील मेंढेकर , विधिज्ञ दिपक पाटील , नितीन बनसोडे, पद्माकर कुलकर्णी, राजाभाऊ कारंडे,राम पाटील मेंढेकर यांनी गायन केले. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे या कार्यक्रमासाठी यांची उपस्थिती होते.

 
Top