तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यात पडत असलेल्या संततधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असुन या नुकसानीची पाहणी करण्यासाठी   माजी मंत्री चव्हाण त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे नातू महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अभिजित चव्हाण करण्यासाठी  तालुक्यात फिरत आहेत.त्यांनी ,चिकुंद्रा,सलगरा (दि),गंधोरा,वानेगाव  किलज ,वडगाव,होर्टी यांसह अनेक गावात जावुन  नुकसान  पाहणी केली .

या पाहणी दरम्यान शेतकऱ्यांची पिके ही गुडघाभर पाण्यात आहेत,जोरदार झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे,पिकांना रोगाची लागण झाली आहे.सरकारने शेतकऱ्यांना १००% नुकसान भरपाई द्यायला हवी तसेच शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी बाबतीत आम्ही सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केलेली असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. 

 
Top