उस्मानाबाद / प्रतिनिधी-

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त भारत सरकारने आझादी का अमृत महोत्सव आयोजित केला आहे. यातून केंद्राचे घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येत आहेत. अनेकांना तिरंगा मिळण्याची अडचण असल्याने पोलिस मुख्यालयात उमेद च्या माध्यमातून तिरंगा झेंडा विक्री केंद्र सुरु केले आहे.

शासनपुरस्कृत यंत्रणेमार्फत विविध ठिकाणी सवलतीच्या दरात ध्वज विक्री केंद्र चालू केली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, उस्मानाबाद अंतर्गत पोलिसांसाठी व नागरिकांसाठी पोलिस मुख्यालयात बुधवारी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, पोलिस उपअधीक्षक जयस्वाल, अरविंद दुबे, विनोद चौधरी, यशवंत बारवकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


 
Top