परंडा / प्रतिनिधी - 

स्वतंत्रच्या अमृत महोत्सव निमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांच्या वतीने जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धा दिनांक ९ ऑगस्ट २०२२ रोजी उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेमध्ये या शाळेचा विद्यार्थी शशांक शहाजी चंदनशिवे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातून दुसरा क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेसाठी परंडा,वाशी, उस्मानाबाद येथील एकुण ७४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.यावेळी कोच म्हणून शिंदे.एस.एम, ठोसर पी.एल, पतंगे ,कदम आदींनी परिश्रम घेतले.परंडा येथील विद्यार्थ्यांना संतोष शिंदे व ठोसर पी.एल यांचे मार्गदर्शन लाभले. 

शशांक शहाजी चंदनशिवे यास मिळालेल्या यशामुळे संत मीरा पब्लिक स्कूलचे  मुख्याध्यापक संतोष भांडवलकर यांनी बुके देऊन सत्कार केला यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते शशांक चंदनशिवे यास मिळालेल्या यशामुळे जिल्ह्यातून कौतुक होत आहे. या शाळेचे संस्थापक प्रतापसिंह पाटील ,शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई या विभागाचे सचिव सुनील चंदनशिवे, शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव, श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर, अध्यक्ष सुनील नाना शिंदे, मा.नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर  आदींनी अभिनंदन व कौतुक केले.


 
Top