तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे वस्तीवर ६२ वर्षीय व्यक्तीवर राहत्या घरी झोपलेल्या ठिकाणी हल्ला करून खून केल्याची घटना दि. ११ ऑगस्ट रोजी घडली आहे.या हल्ल्यामध्ये मयत व्यक्तीला व कुत्र्याला जागीच ठार केले आहे.

 गुरुवार दि.११ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती घर मालक अनिल भोसले यांनी पोलिसांना दिली असता पोलिस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले  .घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब पथक व श्वान पथक हे  दाखल झाले असुन श्वान पथकाद्वारे आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीचा शोध पोलीस करत आहे. 

 
Top