उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याला आणखी मजबूत करुन बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणारा हिंदू धर्मातील महत्वाचा सण आहे. महाराष्ट्रातील पोलिस हे रात्रंदिवस आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी महत्वाची भुमिका बजावत असतात. महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या रक्षणासाठी सदैव ते हजर असतात. त्यांच्या ह्या भुमीकेसाठी भाजपाच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी यांनी त्यांचे औक्षण करुन पोलिस निरीक्षक उस्मान चाँद शेख साहेब, सहाय्यक पोलिस निरीक्षक चव्हाण साहेब आणि त्यांच्या स्टाफला राखी बांधून पोलिस बंधूप्रती सामाजिक बांधिलकी जपली.

 सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांची प्रचंड मोठ्या प्रमाणात बदनामी केली जात आहे तसेच अश्लील मेसेजेस करुन महिलांना जाणूनबुजून मानसिक त्रास दिला जातो याबद्दल पोलिस बांधवांनी वेळोवेळी महिलांना उत्तम प्रकारे सहकार्य केले आहे तसेच शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उस्मान चॉंद शेख साहेबांनी रक्षाबंधनच्या शुभेच्छा देवुन, कसलीही अडचण आली तुम्हाला तरी पोलिस बंधु म्हणून आम्ही समस्त महिला भगिनींच्या सोबत आहोत हा विश्वास दिला.

 त्यावेळी भाजपा महिला मोर्चा ज़िल्हाध्यक्ष अर्चना अंबुरे, भाजपा महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष ॲड.ज्योतीताई वाघे, ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्ष सारिकाताई कांबळे,  भाजपा युवा मोर्चाच्या देवकन्याताई गाडे आणि कौशल्या देशमुख इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

 
Top