उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील कोंड गावात व परीसरात काल अचानक ढगफुटी पावसामुळे अतीव्रष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील  सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.झालेल्या नुकसानीचे 

माजी मंत्री मा. मधुकरराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जावुन पहाणी केली. यावेळी माध्यमाशी बोलताना त्यांनी शासनाकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी अशी विनंती केली आहे. 

शेतकरी संकटात आहे, बहुतांश शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीन शंखी गोगलगायी खाऊन टाकत आहेत.

तर काही शेतकर्यांच्या शेतात वापसा नसल्यामुळे पेरणी झालेली नाही.त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.शासनाने त्वरीत मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अर्थिक मदत न मिळाल्यास शेतकर्यांना मदत मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करू असा इशाराही दिला आहे.

या वेळी जिल्हासंघटक राजाभाऊ शेरखाने , जिल्हाउ पाध्यक्ष लक्ष्मण  सरडे ,तालुकाउपाध्यक्ष आशोक शिंदे ,मेडिया विभागाचे अध्यक्ष काटे,सरचिटणीस सुभाष हींगमीरे,विष्णु चौरे,अतिक वाघमारे, राजेश सुतार, रहीम मुलानी, तुकाराम लोंढे,मोहन भोसले, आशोक भुमकर,पिन्टु शिंदे, संतोष भोसले, सागर रोडगे, बापू शेटे, तानाजी भोपे ,चंद्रकांत शेटे आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top