उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यातील जिल्हापरिषद शाळेतील शिक्षकांचे सर्व प्रलंबित  प्रश्न तात्काळ निकाली काढले जातील अशी ग्वाही प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डाँ.अरविंद मोहरे यांनी दिली असल्याची माहीती राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली.

दि.१ आँगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळासमवेत उस्मानाबाद जिल्हापरिषद प्राथमिक शिक्षण  विभागाचे शिक्षणाधिकारी डाँ .अरविंद मोहरे यांनी दोन तास बैठक घेऊन शिक्षकांच्या  सर्व प्रलंबित  प्रश्नावर चर्चा करुन प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी कार्यवाही सुरु केली.

त्यात प्रामुख्याने जिल्हास्तरावर अनेक दिवसापासुन प्रलंबित असलेला वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचा प्रश्न त्यात १२७ पैकी १२२ प्रस्ताव लगेच मान्य करुन संचिका मुकाअ यांच्या मंजूरी साठी पाठवली.तसेच उर्वरित वरिष्ठ वेतनश्रेणीस पात्र शिक्षकांचे प्रस्ताव मागवून घ्यावेत अशी सुचना दिली.वैद्यकीय परिपुर्तीचे ११० प्रस्ताव  आले असून दोन दिवसात अर्थ विभागास सादर केले जातील. निजाम कालिन शाळा बांधकाम मुख्याध्यापकाकडे न देता इतर यंत्रनेकडुन करुन घेतले जाईल. प्राथमिक पदवीधर  असलेल्या ४० शिक्षकांनी पदावन करुन प्राथमिक शिक्षक पदावर पदस्थापना द्यावी अशी विनंती केलेली आहे ती बदली प्रक्रिया पुर्ण झाल्यावर त्यास मंजूरी देण्यात येईल. विज्ञान/गणित पदवीधर पात्र शिक्षकांना पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी देण्याची कार्यवाही महिना अखेर पुर्ण केली जाईल. मुख्याध्यापक ३५ रिक्तपदे,शिक्षण विस्तार अधिकारी व प्राथमिक पदवीधर शिक्षक १५० रिक्त पदांची पदोन्नती देण्याबाबत सप्टेंबर अखेर प्रक्रिया पुर्ण केली जाईल .

प्रलंबित पुरवणी देयके व सातव्या वेतन आयोगातील दुसरा व तिसरा हप्ता भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा करणे साठी आर्थिक तरतुदी ची प्राथमिक शिक्षण संचालक पुणे यांचे कडे लगेच मागणी करण्यात आली. विद्यार्थीं गणवेश अनुदान व समग्र शिक्षा अनुदान मागणी राज्यस्तरावर पाठपुरावा केला. त्या बाबत लगेच प्रकल्प संचालक .महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांना मेल करुन पत्र पाठवण्यात आहे 

या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश वाघमारे यांनी हे सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितलेण्

शिक्षक संघाच्या शिष्टमंडळात प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष , सोमनाथ टकले,एल.बी,पडवळ,जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे,जिल्हा संपर्क प्रमुख धनंजय मुळे,जिल्हा पतसंस्थेचे अध्यक्ष मोहनराव जगदाळे,जिल्हा प्रवक्ते उमेश भोसले ,तालुका अध्यक्ष राहुल भंडारे, व्हा.चेअरमन अनिल हंगरकर,संचालक हणमंत पडवळ, प्रशांत मिटकरी, प्रशांत घुटे, सोमनाथ निटुरे, सुनिल गपाट, विक्रम लोमटे,नितीन ढगे,नागेश कदम,आण्णाप्पा सर्जे,भारत कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी कळंब तालुका कार्याध्यक्ष प्रशांत घुटे यांनी शिक्षणाधिकारी व सर्वांचे आभार मानले.

 
Top