उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर झेंडा - घरोघरी तिरंगा उपक्रमाच्या प्रसार व प्रसिद्धीसाठी काढण्यात आलेल्या प्रभात फेरी मध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवत प्रत्येक घरावर व दुकानावर तिरंगा ध्वज लावण्याचे आवाहन आ राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. 

   शरद पवार हायस्कुल, बार्शी नाका व नगर परिषद शाळा क्र.१८ भानूनगरच्या वतीने प्रभात फेरी काढली. यावेळी अामदार पाटील बोलत होते.   यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, युवराज नळे, पांडुरंग लाटे, पृथ्वीराज दंडनाईक, प्रकाश तावडे, लक्ष्मण माने, अमोल राजेनिंबाळकर, चंदन जाधव, आदित्य पाटोळे, बंटी मुंडे, रोहित देशमुख, शेषेराव उंबरे, घंटे सर व समस्थ शिक्षक वर्ग उपस्थित होते.


 
Top