तुळजापूर  / प्रतिनिधी-

तालुक्यातील तामलवाडी येथील  बँक ऑफ महाराष्ट्र  शाखा कर्ज देण्यास उशीर लावत असल्याचा पार्श्वभूमीवर  तामलवाडी शाखेसमोर राष्ट्रवादीचे विधानसभा उपाध्यक्ष  शिवाजी सावंत (माजी सैनिक) यांचे उपोषण करण्याचा इशारा दिला होता.  अखेर पिक व अन्य कर्ज प्रस्तावाचा दहा दिवसात निपटरा करण्याचे आश्वासन बँक आँफ महाराष्ट्र शाखाधिकारींनी लिखीत दिल्याने  सावंत यांनी उपोषण मागे घेतले .

  ग्रामपंचायत सदस्य  सतीश माळी, सर्जेराव गायकवाड,  समाधान गायकवाड, शाहीर गायकवाड, श्री चव्हाण,  श्री शिंदे, श्री जाधव, श्री जाधव,  श्री कदम, श्री गिरी व अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिक कर्ज बाबत असलेल्या सर्व समस्या विभागीय व्यवस्थापकांना सांगून तामलवाडी शाखेतील कर्मचाऱ्यावर ताशेरे ओढले त्याप्रसंगी सर्व त्रुटी १० दिवसांमध्ये सुधारण करून घेऊ असे लिखित आश्वासन विभागीय अधिकारी व्यवस्थापकीय मंडळांनी श्री सावंत यांना दिले आहे.


 
Top