तुळजापूर / प्रतिनिधी- 

 तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या मंगरुळ विभागास जिल्हाअधिकारी कौस्तुभदिवेगावकर यांनी शुक्रवार दि.१९ रोजी भेट देवुन शेतशिवारात जावुन नुकसानाची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधुन धीर दिला.

  शुक्रवारी सकाळी कसई  , मंगरुळ   भातंब्रासह अनेक गावांनमध्ये एकाच दिवसात ६५ मिमिवर  पाऊस होवुन अतिवृष्टी झाली होती. यात  पिकांचे  व शेत बांधाचे नुकसान झाले  ाची पाहणी  कौस्तुभ दिवेगावकर यांनी केली. यावेळी नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

 यावेळी भाजपचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे , तहसीलदार सौदागर तांदळे , गटविकास अधिकारी प्रशांत सिंह मरोड , तालुका कृषी अधिकारी जाधव , सरपंच बोधला गायकवाड , ग्रामसेवक पारधे , तलाठी श्रीमती कुलकर्णी , कृषी सहाय्यक श्रीमती धनके , सुरेश पाटील , दशरथ जाधव , प्रकाश हिप्परकर , धनंजय साखरे , व्यंकट म्हमाणे , बाबासाहेब गुरव , तानाजी पाटील , रमेश कामटे , रवि कुलकर्णी , यतीन मेहता , महेंद्र सुरवसे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 
Top