परंडा  / प्रतिनिधी-

 शहरातील एकमेव ट्रस्टी असणाऱ्या जय भवानी गणेश मंडळाची येणाऱ्या गणेशोत्सवाची बैठक   मोठ्या उत्साहात घेण्यात आली.यावेळी नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली.

 उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी आकाश काशीद तर उपाध्यक्षपदी आदित्य नांगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.  कार्यकारिणीमध्ये खजिनदार पदी  सनी काशीद, सहखजिनदार  आण्णा लोकरे, व्यवस्थापक   विनायक काटवटे,सहव्यस्थापक  अतुल काशीद, सचिव  कुणाल जाधव, सहसचिव  ओंकार काशीद, सदस्य  सुजय जाधव,वैभव मस्के, योगेश मस्के यांची निवड करण्यात आली. 

 यावेळी मंडळाचे पंकज नांगरे,प्रकाश काशीद,विशाल काशीद,नंदु आगरकर,नागेश काशीद,प्रशांत नांगरे,राहुल आगरकर,राहुल काशीद,अशोक चव्हाण,पंपु काशीद अनिकेत काशीद विरेंद्र काशीद,करण  काशीद,सुहास आगरकर,बाळराजे आगरकर, मयुर जाधव,प्रतिक मस्के आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top