उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील कांही रस्त्याचे डांबरीकरण तीन वर्षापुर्वी झाले होते. परंतू त्यानंतर सील कोट न भरल्यामुळे सदरचे कांही रस्ते उखडले गेले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने अर्धवट केलेले रस्त्याचे कामे पुर्ण करावे, अशी मागणी फोरम ऑफ उस्मानाबाद सििटझन्स (फूक) या संघटनेने केली आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात जिजाऊ चौक,बार्शी रस्ता आदी रस्त्यावरील अधर्वट डांबरीकरणाचे कामे तीन वर्षापुर्वी केले होते. त्यानंतर या रोडवर शेवटचा सील कोट भरलेला नाही. त्यामुळे कांही ठिकाणी रस्ते उखडले असून खड्डे पडलेले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्यासंदर्भात पाठपुरवा करून देखील कोणते ही काम केले गेले नाही. सदर काम एक महिन्याच्या आत न केल्यास फूक संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे. 

धर्मवीर कदम, रंगनाथ भोसले, गणेश वाघमारे, मुकेश नायगावकर, पी.आर गपाट, शंकर खुने, युसुफ पठाण, सुधीर गायकवाड आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. 

 
Top