उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भाजप सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेली रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे. सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांचे हित बघणार असे सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर जेव्हा प्रत्यक्षात मदत देण्याची वेळ आली तेव्हा मात्र हात आखडता घेणे दुर्देवी असल्याचे मत आमदार कैलास घाडगे पाटील यानी व्यक्त केले. २०१९ रोजी अशाच प्रकारे नुकसान झालेल्या कोल्हापुर सांगली जिल्ह्यात निकष बाजुला ठेवून मदत केली. पण आता त्याच भाजप सरकारने असा दुजाभाव करुन शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचेही पाटील म्हणाले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कोल्हापुर व सांगली जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारची अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठ नुकसान झाले होते. त्यावेळी त्यानी शेतकऱ्यांचा सहानभुतीपूर्वक विचार करुन कोरडवाहू पिकांना २० हजार ४०० रुपये, सिंचनाखालील पिकास ४० हजार ५०० रुपये व बहुवार्षिक पिकास ५४ हजार रुपयाची मदत देऊ केली होती. मग आता शेततळ्याविषयी या सरकारची सहानभुती कमी झाली का ?असा प्रश्न पाटील यांनी विचारला आहे. विरोधी पक्षात असताना एक भुमिका व सत्तेत आल्यानंतर त्याच भूमिकेला छेद देण्याचा हा प्रकार अत्यंत दुर्देवी आहे. असे अामदार कैलास पाटील म्हणाले. 


 
Top