उस्मानाबाद / प्रतिनिधी-

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यभर आझादी गौरव पदयात्रा आयोजित करण्यात आले असून त्याच पद्धतीने उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले  यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण  यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्ह्यात ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान “आझादी गौरव पदयात्रा” काढण्यात येणार आहे.

  देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेसच्या वतीने देशासह राज्यात आझादी का गौरव तिरंगा पदयात्रा सुरू असून ही यात्रा सकाळी 9 वा.कळंब शहरात पोहचली यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्राची सुरुवात करण्यात आली.  पदयात्रा हुतात्मा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिजाऊ चौक, संभाजी महाराज चौक, अशी मिरवणूक झाल्यानंतर सोमु नाका येथे समारोप कार्यक्रम संपन्न झाला .काँग्रेसच्या ‘आझादी का गौरव’ तिरंगा पदयात्रेचे कळंब येथे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, कळंब तालुका  अध्यक्ष पांडुरंग   कुंभार ,भागवत भाऊ धस व इतर मान्यवरानी मनोगत व्यक्त केले.

यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील , मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने , खलील सय्यद  ,  धनंजय राऊत,अग्निवेश शिंदे  ,सिद्धार्थ बनसोडे,मेहबूब पटेल ,मडके ,भैय्या निरफळ ,संजय पवार ,ज्योती सपाटे ,अंजली ढवळे ,प्रभाकर जाधव,सचिन गायकवाड, सुरेश मस्के,शहाजहान शिकलगार , अशोक भातलवंडे ,शंकर करंजकर ,वाघमारे , विलास करंजकर ,भूषण देशमुख ,पोपट अंबिरकर , अनंत घोगरे,रोहित कसबे ,ताहेर शेख,दत्ता आंबिरकर ,कलिम तांबोळी,गोरख आंबिरकर,दादा आंबिरकर, बालाजी पवार,श्रीमंत आंबिरकर, नितीन अंगरखे ,शिलानंद शिनगारे , व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top