उस्मानाबाद / प्रतिनिधी-

धाराशिव जिल्हयात आ.राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह असंख्य भाजपा पदाधिकारी यांनी मन की बात कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिले. 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त झालेल्या देशभरातील कार्यक्रमाचं कौतुक केलं.  स्वातंत्र्यदिनाच्या विशेष प्रसंगी आपल्याला देशाच्या सामूहिक शक्तीचे दर्शन झाले असे मोदीजी ने सांगितले.

  आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळलापूर तालुक्यात दिपक नगर तांडा येथे मन की बात कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाचे आयोजन केले होते. तसेच ढोकी येथे भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, निहाल काझी,  यांनी आजचा मन की बात कार्यक्रम ढोकी ग्रामस्थ समवेत ऐकला. कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांसोबत अल्पोपहार केला. दरम्यान गावांतील विविध गोष्टींवर चर्चा केली, लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी ढोकी गावातील नागरिक, महिला, युवक, जेष्ठ आणि पंचक्रोशीतील नागरीक, कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


 
Top