उस्मानाबाद / प्रतिनिधी 

 आपल्या जिल्ह्याची दर्शनिका म्हणजे शासकीय सोयी सुविधांची माहिती असलेला ग्रंथ असणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्याचे विशेष जिल्हा पुरवणी गॅझेटिअर तयार करावयाचे आहे. हा महत्वपूर्ण दस्तऐवज असणार आहे. त्यासाठी आवश्यक महत्वपूर्ण माहिती संबंधित विभागांनी तातडीने उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन राज्य शासनाच्या दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दि. प्र. बलसेकर यांनी आज येथे केले.येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या नियोजन सभागृहात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्स्वानिमित्त जिल्हा विशेष पुरवणी गॅझेटिअर  निर्मिती बाबत आयोजित बैठकीत डॉ.बलसेकर बोलत होते.

 यावेळी उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, जिल्हा क्रीडा अधिकारी कैलास दिगंबर लटके,कृषी उत्पन्न बाजार समितीचे श्रीकांत शामराव, जिल्हा दुग्ध व्यवसायाचे बी.के मुसांडे, मृद व जलसंधारण विभागाचे आर.ए वावडक, जि.प.लघुपाटबंधारे विभागाचे सी.आर.राऊळ, उस्मानाबाद पाटबंधारे विभाग क्र.1 चे उपअभियंता आय.पी.बांगड, जिल्हा अग्रणी बॅकेचे व्यवस्थापक सचिन ससाणे, जि.प.चे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ.शिवकुमार हालकुडे, आर.एस.कांबळे, स.श.देवगिरे, सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाचे जी.बी.काकडे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी डी.व्ही.फताटे,उद्योग अधिकारी निलेश रा.सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे आर.डी.गायकवाड, रोहित रामराव चोबे,बी.ए.चौगुले, परिवहन महामंडळाचे एस.ए.कदम, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. राजकुमार ढवळशंख, जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.दीपक कदम, उपनिबंधक सहकारी संस्थाचे एम.आर. अंबिपुरे, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एस.एम.पाटील,एम.जे.गावंड, जिल्हा कारागृहाचे पी.एस.खजुरीकर, वरीष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाचे पवार के.एस., महावितरणचे कय्युम मुलाणी, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे गिरीश एम.जोशी, पांडुरंग मोरे, सुनिल शिरापुरकर, पोलीस निरीक्षक व्ही एस जायसवाल आदी उपस्थित होते.

 पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिनस्त दर्शनिका विभागाद्वारे राज्यातील जिल्हा गॅझेटिअर ग्रंथ तसेच राज्य गॅझेटिअर ग्रंथ प्रकाशित करण्यात येतात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निर्मित प्रत्येक जिल्ह्यांचे विशेष पुरवणी दर्शनिका (गॅझेटिअर) ग्रंथ व त्याचे ई-स्वरुपात प्रकाशन एका विहित कालमर्यादेत पूर्ण करावयाच्या सूचना राज्याचे मुख्य सचिव यांनी दिल्याने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने त्या-त्या जिल्ह्याची शासकीय आणि  निमशासकीय कार्यालयाची प्रकरणपरत्वे माहिती तसेच  स्वातंत्र्या नंतरच्या ७५ वर्षात केलेली भरीव कामगिरी ,  महत्त्वपूर्ण योजना तसेच वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प ज्यामुळे त्या त्या जिल्ह्याच्या विकासात आमुलाग्र बदल पहावयास मिळतो. आपल्या जिल्ह्याच्या पर्यटन आणि प्रेक्षणीय स्थळांची माहितीही या गॅझेटिअर मध्ये असणार आहे. पर्यटणाला चालणा मिळाली तर जिल्ह्याचा औद्योगिक विकासही साध्य होईल असेही डॉ.बलसेकर यावेळी म्हणाले.

  डॉ. बलसेकर म्हणाले, गॅझेटिअरला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. या गॅझेटिअरची दखल सर्वोच्च न्यायालयानेही घेतली आहे. विशेष पुरवणी गॅझेटिअरमध्ये जिल्ह्यातील कृषी,पशुपालन,साक्षरता,पोलीस यंत्रणा,आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, पायाभूत सोयीसुविधा, परंपरा, वेशभूषा, ऐतिहासिक वास्तू, प्रकल्प, औद्योगिक प्रकल्पासह विविध सांख्यिकीय आणि विश्लेषणात्मक माहिती उच्च् दर्जाच्या छायाचित्रांसह अपेक्षित आहे. अमृत महोत्सवी वर्षाच्या माध्यमातून या 75 वर्षांच्या विकासाचा आढावा घेवून एक विश्वसनीय आणि वस्तूनिष्ठ दस्तऐवज उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सर्व विभागांनी तातडीने माहिती उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी आवाहन केले..

 जिल्ह्याचे प्राचीन नाव नळदुर्ग होते. 1905 साली याचे नाव उस्मानाबाद झाले. या जिल्ह्याची दर्शनिका 1973 पर्यंत अपडेट आहे.त्यामुळे आता आपल्या 75 वर्षांची माहिती देण्याची आवश्यकता नाही. सर्व विभागांनी पुढील वर्षांची माहिती म्हणजे 1971 ते 1991, 1992ते 2001 आणि 2002 ते 2021 अशा तीन टप्प्यात द्यावी. यासाठी संबंधित विभागांना सोप्या तक्त्यांमध्ये माहिती भरावयाची आहे.

 यावेळी सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे म्हणाले की उस्मानाबाद जिल्ह्याच्या ऐतिहासिक ,भौगोलिक आणि सामाजिक ग्रंथ (दर्शनिका) तयार करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित कार्यालये विहीत मुदतीत आपण मागितलेली माहिती उपलब्ध करून देतील.


 
Top