उस्मानाबाद / प्रतिनिधी 

 राज्यातील क्रीडा संस्कृतीची जोपासना आणि जनतेत खेळाडूवृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी मेजर ध्यानचंद (हॉकीचे खेळाडू) यांचा दि. 29 ऑगस्ट हा जन्मदिन क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी सर्वसमावेशक आणि तंदुरुस्त समाजासाठी सक्षम म्हणून क्रीडा या संकल्पनेवर (थीम) राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट, 2022 साजरा करण्यात येणार आहे.

 क्रीडा दिनाचे औचित्य साधून प्रभात फेरी,रॅली, विविध क्रीडा प्रकारात विविध वयोगटासाठी क्रीडा स्पर्धाचे आयोजन करणे, क्रीडा विषयक प्रचार आणि प्रसारासाठी सहाय्यभूत ठरतील असे उपक्रम, क्रीडा विषयक परिसंवाद, क्रीडा वैदयकशास्त्र, क्रीडा मानसशास्त्र, आहारशास्त्र यांचे महत्व सर्व स्तरांवरील लोकांसाठी व्यावसायिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा समावेश, चर्चासत्र, व्याख्यान आणि क्रीडा प्रदर्शन करावेत.

 तसेच राज्यात स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवा प्रित्यर्थ दि. 29 ऑगस्ट 2022 ते 02 ऑक्टोबर 2022 या कालावधीत “फिट इंडिया फ्रीडम रन” ही चळवळ, उपक्रम जिल्हयातील सर्व शाळा,  महाविद्यालयामध्ये यशस्वीरित्या राबविण्याबाबतचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयातील क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे (9975576600) यांच्याशी संपर्क साधावा.


 
Top