तुळजापूर / प्रतिनिधी 

 तुळजाभवानी मंदिरात बैल पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महंतांच्या बैलांसह कोल्हापूर संस्थानच्या बैलांनी वाजतगाजत थेट मंदिरात जाऊन तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.

कृषी प्रधान भारत देशात बहुतेक सर्वच हिंदू धार्मिक सण- उत्सव आणि परंपरा या कृषी आधारीत आहेत. त्याच कृषी परंपरेतून बैलांचा कष्टाचे ऋण व्यक्त करण्यासाठी बैल पोळा साजरा करण्यात येतो. गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे सर्वच सण उत्सव साधेपणाने साजरे करावे लागले होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्या नंतर यावर्षी बैल पोळा सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. तुळजाभवानी मंदिरात मातेचे महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा तसेच कोल्हापूर संस्थानच्या बैलांना वाजतगाजत मंदिरात आणत तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम, नागेश शितोळे, सिद्धेश्वर इंतुले, संपत गंगणे, बालाजी गंगणे यांच्यासह मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते. 

 
Top