उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 गतीरोधकावर ट्रकचा वेग कमी होताच अज्ञात दोघांनी ट्रकच्या काचा फोडल्या. तसेच चालकास मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम लुटून नेहली. ही घटना २० ऑगस्ट रोजी तुळजापूर येथे घडली. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण (जि. ठाणे) येथील गौरव चव्हाण हे तुळजापूर शहरा- जवळील महामार्गावरून जात होते. यावेळी सदर ट्रक गतीरोधकावर आला असता चव्हाण यांनी ट्रकचा वेग कमी केला. दरम्यान, ट्रकच्या पाठिमागून आलेल्या कारमधील (क्र. क्र. एमएच २५ / यू / १०१०) अज्ञात दोन व्यक्तींनी ट्रकच्या समोरील काचेवर दगड मारला. यात ट्रकची काच फुटून नुकसान झाले. त्यानंतर संबंधित अज्ञात दोघे ट्रक चालकाच्या उजव्या बाजुच्या कॅबिनमधून ट्रकमध्ये चढले. यावेळी त्यांनी ट्रक चालकास खाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारह ाण करण्यास सुरूवात केली. तसेच चव्हाण यांच्या शर्टच्या खिशात अस लेले ५ हजार रूपये लुटून नेले.

याप्रकरणी ट्रक चालक गौरव चव्हाण यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात दोघांविरूद्ध भादंसं कलम ३९२, ४२७, ३४ अन्वये २० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Top