उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्य शासन शेतकऱ्यांना केंद्र बिंदू ठेवून उपाय योजना करत आहेत. सध्या राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि गोगलगाय व इतर रोगांमुळे पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांनी खच्चून न जाता धैर्याने या समस्यांशी तोंड द्यावे,राज्य शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. एकही शेतकरी शासनाच्या नुकसानभरपाई पासून वंचित राहणार नाही,असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. 

उमरगा तालुक्यातील कवठा येथे अतिृष्टी आणि गोगलगाय मुळे पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी श्री.अब्दुल सत्तार आले होते यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी  आमदार ज्ञानराज चौगुले, अभिमन्यू पवार, संजय बनसोडे, विभागीय कृषी सचिव एकनाथ डवले , जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावाकर,लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तीर्थकर, समाजसेवक दिनकर पाटील आदी उपस्थित होते.

श्री.सत्तार पुढे म्हणाले, गोगलगाय मुळे पिकांच्या मोठ्याप्रमणात नुकसान होत आहे.त्यांना मारण्यासाठी वापरण्यात येत असलेले कीटनाशकांमुळे पक्ष्यांनाही मृत्यू मुखी पडावे लागत आहे.त्यावर लवकरच उपाय योजना करण्यात येईल.तसेच अतिृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांनाही खूप नुकसान झाल्याचे आढळून आले आहे तेंव्हा राज्य शासनाने नुकसाभरपाई दुप्पट केली असून पूर्वी प्रती हेक्टरी ६ हजार आठशे  वरून १३ हजार ६०० केले तसेच पूर्वी २ हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतक-यांना  मदत मिळत होती आता राज्य शासनाने ती ३ हेक्टर पर्यंत केल्याने जास्तीत जास्त ४० हजार आठशे रुपये केली आहे.

पीकविम्यासाठी अनेक शेकऱ्यांनी काही अटी जाचक असल्याचे सांगितले आहे, मागील चार दिवसांपासून मी तीन विभागातील ३७ तालुक्यांचा दौरा केला आहे.यामध्ये शेतकरी बांधवांनी त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत.मी अपल्या वेदना राज्य शासनाच्या वाती केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देईल आणि या जाचक अटी शिथील करावी आर प्रस्ताव पाठवंन्याबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत रिपोर्ट सादर करणार,असेही श्री सत्तार यावेळी म्हणाले.शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन सक्षम आहे.आणि शेतकऱ्यांना मदत करण्यास आम्ही कुठेही कमी पडणार नाही. असेही ते यावेळी म्हणाले. 
Top