उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरु होऊ नये अशी इच्छा असणाऱ्यांनी आपल्यावर या धाडी टाकायला लावलं. त्यांचीही घरे काचेची आहेत त्यांनी एक दगड मारला आता आमचे दोन्ही हात मोकळे असतील, असा इशारा साखर उद्योजक अभिजीत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे. 

गेल्या चार दिवसापासून उस्मानाबाद जिल्हयातील चोराखळी येथील धाराशिव सहकारी साखर कारखानासह अभिजीत पाटील यांच्या इतर चार कारखान्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या. या धाडीमध्ये कांही न मिळाल्याचे स्पष्ट करून पाटील यांनी  विरोधकांवर टिका केली. 

 आमच्या सर्व कारखाने आणि इतर व्यवसायात त्यांना 1 कोटी 12 लाखांची रोकड सापडली होती. मात्र ही सर्व रोकड रेकॉर्डवर असल्याने त्यांनी ती जप्त केलेली रक्कम देखील आम्हाला परत दिल्याचे सांगितलं. महिलांच्या स्त्री धनात असलेले 50 ते 60 तोळे सोनेही आयकर विभागाने हिशोब बघून परत दिल्याचे सांगताना व्यवहारात ज्या काही त्रुटी आढळल्या आहेत त्याची कागदपत्रे येत्या पंधरा दिवसात देण्याच्या सूचना आयकर विभागाने दिले असल्याचे त्यांनी सांगितलं. या चार दिवसात अभिजीत पाटील त्यांचे बंधू अमर पाटील, कारखान्याचे संचालक, सभासद आणि कर्मचारी अशा 100 लोकांची चौकशी आयकर विभागाने केल्याचा खुलासाही त्यांनी केला. विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरु होऊ नये अशी इच्छा असणाऱ्यांनी आपल्यावर या धाडी टाकायला लावल्याचे सांगताना त्यांचीही घरे काचेची आहेत त्यांनी एक दगड मारला आता आमचे दोन्ही हात मोकळे असतील, असा इशारा दिला.



 
Top