उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सोनाई उद्योगसमूहाचे चेअरमन  दशरथ  माने यांनी रुपामाता उद्योगसमूहातील रुपामाता अर्बनच्या तुळजापूर शाखेला सदिच्छा भेट दिली.  यावेळी त्यानी शाखेच्या कामकाजाची माहिती करून घेतली व कौतुक करून आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांच्या समवेत इंदापूर जिल्हा पुणे येथील उद्योजक व नगरसेवक वाघ तात्या उपस्थित होते.

या प्रसंगी रुपामाता उद्योग समुहाचे अध्यक्ष व्यंकटराव गुंड  यांच्या हस्ते कुलस्वामिनी तुळजाभवानीची प्रतिमा देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विभागीय अधिकारी  गोपाळ जंगाले, शाखा अधिकारी   गजानन वैद्य,  गणेश खराडे, व इतर सहकारी उपस्थित होते. 


 
Top