उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 धाराशीव जिल्ह्यातील लोहारा तालूक्यातील चिंचोली रेबे येथील ग्रामपंचायत वर महाविकास आघाडीची निविर्वाद सत्ता येउन सरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री. गोकूळ नानाराव मोरे यांची तर उपसरपंच पदी शिवसेनेच्या   पवन दयानंद मोरे यांची निवड झाल्याबद्दल  धाराशीव लोकसभा मतदार संघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि जिल्हाप्रमुख तथा कळंब – उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे - पाटील यांनी पवनराजे कॉम्प्लेक्स, धाराशीव येथे ग्रामपंचायत च्या सरपंच, उपसरपंच यांच्यासह सर्व सदस्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील राजकीय आणि सामाजीक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 या प्रसंगी खासदार राजेनिंबाळकर यांनी सर्व सदस्यांना गावकऱ्यांनी आपल्या सर्वांवर ठेवलेल्या विश्वासाला कसल्याही प्रकारचा तडा जाणार नाही ह्या उद्देशाने कार्य करत राहून त्यांनी ठेवलेल्या विश्वासाचे फळ त्यांना तुमच्या सर्वांच्या कामातून द्या, असा मोलाचा संदेश दिला.

   याप्रसंगी सदस्य सौ.फुलाबाई लंकेश गायकवाड, सौ.सुवर्णा शरद मोरे, श्री.गुलाब मोरे, श्री.शरद मोरे, श्री.भालचंद्र मोरे, ओमकार मोरे, दादासाहेब मोरे, काशीराम मोरे, बापुराव गायकवाड, हणमंत कावळे, अमर शिंदे, बाळासाहेब मोरे, सोपान शेख, रोहीत बेंद्रे यांच्यासह गावातील नागरीक आणि शिवसैनीक आणि पदाधीकारी उपस्थीत होते


 
Top