उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हा मेस्टा कार्यकारणीची बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  संजयराव तायडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित अभिनव इंगलीश स्कुल येथे संपन्न झाली. या वेळी संस्थाचालक व शाळेच्या विविध अडचनीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यामध्ये RTE मोफत शिक्षण योजने अंतर्गत प्रवेश दिलेल्या विध्यार्थ्यांची फीस शासनाकडून 2019-20,2020-21,2021-22 या तीन वर्षाची रक्कम येणे आहे.

ही रक्कम शासनाने शाळेच्या बँक खात्यावर त्वरीत वर्ग करावी ,अन्यथा संघटनेकडून तीव्र अंदोलन छेडण्यात येईल असा ठराव पारित करण्यात आला तसेच  RTE प्रमाणपत्राचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे दाखल केलेल्या शाळानां त्वरित प्रमाणपत्र वितरीत करण्यात यावेत असा ही ठराव मंजूर करण्यात आला., विद्यार्थी TC नियमानुसार फीस भरुन घेवुनच देण्यात यावी.,

शिक्षणाधिकारी यांच्याकडे TC  देत नसल्याबद्दल पालक तक्रार करतात व  शिक्षण विभाग शहनिशा न करताच TC देण्याबाबत शाळेला पत्र देतात,

या बाबत शिक्षण विभागाने पालकांना फीस भरुन शाळा सोडल्याचा दाखला घेऊन जावा अशी समज द्यावी तसेच राज्यकार्यकारणीच्या बैठकीस दि 28/8/2022 रोजी बीड येथे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे ही , आहवान करण्यात आले.

  या वेळी संजयराव तायडे पाटील यांचा यथोचीत सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरडे यानी केले ,या बैठकीस कार्याध्यक्ष सय्यद एस.ए.,सतीश मोदाणी,सरचिटणीस शहिजी जाधव,कोषाध्यक्ष भास्कर बोंदर,सचिव सचिन पाटील,तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, डाँ.रामेश्वर यादव,दत्तात्रय दिवाने, देशमुख,मोरे सर, बचाटे सर,जेवळीकर,सय्यद आदी संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन शहाजी जाधव यांनी केले तर आभार सय्यद सर यांनी मानले.

 
Top