उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष व भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्तग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मा. प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.सदरील ग्रंथ प्रदर्शनात स्पर्धा परीक्षा, कथा, कादंबरी, भारताचा इतिहास आणि फाळणी वरील ग्रंथाचा समावेश आहे. सदरील ग्रंथ प्रदर्शन हे १८ ते २० ऑगस्ट २०२२ पासून सकाळी ९:३० ते ६:०० या वेळेत सुरु राहील.कार्यक्रम यशस्वितेसाठी महाविद्यालयाचेग्रंथपाल डॉ. मदनसिंग गोलवाल, श्री. नागनाथ देशमुख, श्री. अल्ताफ आतार, श्री. बशीर शेख, श्रीमती सुवर्णा वाघमारे आणि श्रीमती विशाखा वाकुरे यांनी सहकार्य केले. 

 

 
Top